IPL फायनल पाहण्यासाठी तीन देशांच्या क्रिकेट बोर्डांचे अध्यक्ष भारतात येणार

IPL फायनल पाहण्यासाठी तीन देशांच्या क्रिकेट बोर्डांचे अध्यक्ष भारतात येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 28 मे रोजी होणारा आयपीएल फायनल सामना पाहण्यासाठी बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांना भारतात आमंत्रित केले होते. यावेळी आशिया कप 2023 च्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा होणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले.

आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. एकीकडे पाकिस्तान यजमानपदासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे आशियाई क्रिकेट परिषद (ACC) नव्या यजमानाच्या शोधात आहे. ACC चे अध्यक्ष जय शाह आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षीच भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते. तटस्थ देशात सामने होऊ शकतात, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष 28 मे रोजी अहमदाबादला येणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या टाटा आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये हे सर्व सहभागी होणार आहेत. आशिया चषक 2023 बाबत भविष्यातील कृती ठरवण्यासाठी यावेळी चर्चा होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news