Sanjay Raut: कोकण अन् ठाकरेच्या शिवसेनेचे नाते अतूट- संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: काल रविवारी (दि.०५) कोकणातील खेड येथे शिवसेना ठाकरे गटाची विराट सभा झाली. या सभेतील गर्दी पाहून कोकण आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नाते किती अतूट आहे हे स्पष्टपणे दिसून आले. असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, खेडमध्ये काल (दि.०५) झालेल्या सभेतून महाराष्ट्राचा कल स्पष्ट दिसत आहे. जनता किती संतप्त आहे हे कालच्या सभेतून स्पष्ट झालेच आहे. लाखो लोक ठाकरेच्या पाठिशी असून, येत्या निवडणूकात देखील याचे स्पष्ट चित्र दिसणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

देशातील लोकशाही धोक्यात आहे. आजही सरकारच्या विरोधात बोलले तरी, विरोधी पक्षातील नेत्यांवर हल्ले सुरूच आहेत. मिंद्ये गटाची स्क्रिप्ट ही भाजपा लिहते. जनता भाजपच्या नावाने शिमगा करत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील जनता संतप्त आहे. जनता शिमगा करते तेवढा पुरेसे आहे, अशी मिश्किल टिकाही राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news