भीमाशंकर मंदिर परिसरात पुजारी एकमेकांना भिडले ; ३६ जणांवर गुन्हा दाखल

file photo
file photo

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : देवाच्या मुर्तीवर अभिषेक, पुजा करुन फुले वाहणाऱ्या पुजाऱ्यानी पुजेच्या संधीवरुन एकमेकांवर लाठ्या-काठ्यानी आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार भीमाशंकर मंदिर परिसरात सोमवारी (दि. १६) घडला. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकारावरून दोन्ही बाजुच्या ३६ पुजाऱ्यांवर खेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शंकर गंगाराम कौदरे (वय ६५, रा. खरोशी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांविरोधात तर गोरक्ष यशवंत कौदरे (वय ४०, रा. भीमाशंकर, ता खेड) यांच्या तक्रारीवरुन विरोधी गटातल्या १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भीमाशंकर मंदिर गाभारा तसेच परिसरात असलेल्या शनि मंदीरात पुजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी दुपारी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असताना हा वाद व हाणामारीचा प्रकार घडला. एका गटाने जमावाने येऊन पुजेला बसलेल्या पुजाऱ्यांना जबरदस्तीने उठवून येथील ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या काठ्या, लोखंडी पाईप तसेच खुर्च्या एकमेकांना मारून जखमी करण्यात आले. पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.

या प्रकाराबाबत देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांना विचारले असता ते म्हणाले की, चालु पुजेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे तसेच जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याचे काम केले जात आहे. सगळे लोक आमचेच आहेत. सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल. मात्र दांडगाई खपवून घेतली जाणार नाही.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news