घाबरु नका! कोरोनाच्या XE व्हेरियंटचा मुंबईतील संशयित रुग्ण ठणठणीत, संपर्कातील व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह

घाबरु नका! कोरोनाच्या XE व्हेरियंटचा मुंबईतील संशयित रुग्ण ठणठणीत, संपर्कातील व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुंबईत कोरोनाच्या XE नावाच्या नव्या व्हेरियंटची (new Covid XE variant) लागण झालेल्या संशयित रुग्णाची नोंद झाल्याने खळबळ उडाली होती. याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत महत्वाची माहिती दिली आहे. नवीन व्हेरियंटचा संशयित रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच्या 'हाय-रिस्क' संपर्कातील व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नवीन व्हेरियंटची पुष्टी करण्यासाठी नमुने NIBMG कडे पाठवले आहेत. आम्ही सर्व सुरक्षित रहावेत यासाठी आम्ही काम करत आहोत. यामुळे लोकांनी घाबरू जाऊ नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

XE व्हेरियंटबाबत अद्याप कोणतीही खात्रीलायक माहिती मिळाली नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते. यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे आवाहन त्यांनी केले होते. मुंबईमध्ये कोरोनाच्या XE आणि कपा या नव्या व्हेरिएंटचा प्रत्येकी एक संशयित रुग्ण आढळून आला असल्याची माहिती समोर आली होती. दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून मुंबईत आलेल्या एका तरूणीला XE व्हेरिएंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होते.

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात माहिती दिलेली आहे की, XE व्हेरियंट हा कधीही सर्वात संक्रामक होऊ शकतो. XE हा एक पुन:संयोजन असून BA-1 आणि BA-2 हे ओमायक्रॉनचे म्युटेशन आहे. पुन:संयोजन तेव्हा निर्माण होते जेव्हा एकाच व्यक्तीच्या शरीरात अनेक प्रकारचे कोरोनाचे व्हेरियंट संक्रमित असतात. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे की, "नवा आलेला XE व्हेरियंट BA-2 च्या तुलनेत १० टक्क्याने अधिक संक्रामक आहे." परंतु, या विधानाची अजुनही पुष्टी करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news