OBC Reservation : मुंबईत ओबीसी नेत्यांची खलबते; पुढील रणनीती ठरणार

OBC Reservation : मुंबईत ओबीसी नेत्यांची खलबते; पुढील रणनीती ठरणार
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांच्या बैठकीला आज (दि.२८) सायंकाळी मुंबईतील भुजबळ यांच्या निवासस्थानी सुरूवात झाली. OBC Reservation

या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर, मा. आ. नारायण मुंडे, मा.खा. समीर भुजबळ, मा. आ. पंकज भुजबळ, आगरी समाजाचे राजाराम पाटील, शब्बिर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, मा.आ तुकाराम बिडकर, लक्ष्मण हाके, दौलतराव शितोळे, सत्संग मुंडे, कल्याण दले, दशरथ पाटील, अॅड. सुभाष राऊत, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, ईश्वर बाळबुद्धे, बाळासाहेब कर्डक यांच्यासह विविध संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

या बैठकीत सध्या चालू असलेल्या आरक्षणाच्या परिस्थितीवर काही ठराव देखील मंजूर करण्यात येणार आहेत. ओबीसी समाजामध्ये सध्या असलेल्या असंतोष आणि भीतीच्या वातावरणावर चर्चा केली जाणार आहे. आणि पुढील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news