पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची (एलआयसी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) ४ मे रोजी येईल आणि ९ मे रोजी बंद होईल. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीतील साडे तीन टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे सरकारला २१ हजार कोटी रुपये मिळतील.