Drishyam २ : शत्रू पराभूत करण्याची संधी देतोय म्हणत अक्षयचा फर्स्ट लूक (photo)

Drishyam २
Drishyam २
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, श्रिया सरन, तब्बू आणि अक्षय खन्नाचा आगामी 'दृश्यम २' ( Drishyam २ ) चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील ट्रेलरनंतर एक- एक करून प्रत्येक कलाकरांचे लूक समोर येत आहेत. चित्रपटात अजय देवगणने मुख्य विजय साळगावकरची भूमिका साकारली आहे. तर सध्या तब्बूनंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा पहिला लूक समोर आलाय.

अजयच्या 'दृश्यम २' ( Drishyam २ ) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्याचा समिश्र प्रतिसाद मिळाला. यानंतर या धमाकेदार चित्रपटातील एकापेक्षा एक कलाकारांचे लूक व्हायरल होत आहे. नुकताच तब्बू आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अक्षयचा लूक तब्बूच्या इंन्स्टाग्रामवर तर तब्बूचा लूक दिग्दर्शक तरूण आदर्श यांच्या टविटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

'दृश्यम २' चित्रपटात तब्बू एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसतेय. कारण शेअर झालेल्या पोस्टरमध्ये तिच्या दोन्ही बाजूला दोन पोलिस दिसतात. तर अक्षय खन्नाच्या पोस्टरमध्ये ते गंभीर दिसत असून त्याच्यासमोर एक बुद्धिबळाचा बोर्ड आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तब्बूने 'शत्रू अनेकदा तुम्हाला पराभूत करण्याची संधी देतो, १८ नोव्हेंबर २०२२ रोजी. #दृश्यम2 येतोय.' असे लिहिले आहे. यावरून अक्षय खन्ना हेच पात्र विजय साळगावकरला चित्रपटात तुरुंगात पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजय देवगण, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू यांची या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अजय देवगण विजय साळगावकरची मुख्य भूमिका साकारत आहे. तर तब्बू पोलीस महानिरीक्षक मीरा देशमुखच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. तर संजीव जोशी, आदित्य चौकसे आणि शिव चनाना यांनी सहनिर्मिती केली आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news