पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन अवॉर्ड, प्राईमटाइम एमी अवॉर्ड विजेती आणि अभिनेत्री जोडी कॉमर (Jodie Comer) हिला 'जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री' म्हणून गौरवण्यात आले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी झेंदया ( Zendaya ) तर तिसऱ्या स्थानी बेला हदीद ( Bella Hadid ) आहे. Killing Eve, Free Guy and The Last Duel च्या हार्ले स्ट्रीट सर्जनने केलेल्या अभ्यासात जोडी कॉमर जगातील सर्वात सुंदर ठरली आहे. यात अभिनेत्री जोडी कॉमर ( Jodie Comer ) हिने ९९.५% गुणांकन प्राप्त करत पहिला क्रमांक मिळविला आहे. यामुळे तिला जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं आहे. यावेळी तिला मानचिन्ह देण्यात आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर झेंदया, तिसऱ्या क्रमांकावर बेला हदीद आणि चौथ्या क्रमांकावर बियॉन्से पोहोचली आहे.
कॉस्मेटिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी मॅपिंग तंत्र वापरून सुंदर सेलिब्रिटींची यादी तयार केली आहे. याच त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानात चेहरा किंवा शरीराचे गुणोत्तर १. ६१८ (Phi) च्या जितके जवळ असेल तितके ते अधिक सुंदर असेल असे समीकरण आहे.
हेही वाचलंत का?