पुतीन ठणठणीत आहेत ! क्रेमलीनचा निर्वाळा; हार्ट अटॅकच्या अफवांचे केले खंडन

पुतीन ठणठणीत आहेत ! क्रेमलीनचा निर्वाळा; हार्ट अटॅकच्या अफवांचे केले खंडन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची तब्येत बिघडली असल्याची चर्चा सर्वत्र होत असताना एक महत्त्वाची अपडेट समोर येताना दिसते आहे. द क्रेमलीनने पुतीन यांची तब्येत ठीक असल्याची माहिती दिली आहे. क्रेमलीनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी पुतीन बॉडी डबल वापरत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. ही केवळ एक अफवा असल्याच पेस्कोव यांनी म्हटलं आहे. एका रशियन टेलिग्राम अकाऊंटवरुन आलेल्या बातमीनुसार माध्यमांनी पुतीन यांच्या तब्येतीबाबत विचारले असता हा खुलासा केला. या टेलिग्राम अकाऊंटवर पुतीन यांची तब्येत बिघडल्याची बातमी व्हायरल झाली होती.

2022 पासून, एकाहत्तर वर्षीय पुतीन कर्करोग आणि पार्किन्सन्स यासह गंभीर आजारांशी झुंज देत असल्याचे विविध अहवालांनी सुचवले आहे. पुतीन यांच्या अस्थिर आणि शरीरावर सूज आलेल्या परिस्थितिवरुन अशा अफवांना अधिक बळ मिळाले आहे. सप्टेंबरमध्ये, 'Z-blogger' Pozdnyakov याच्या एका रशियन टेलिग्राम चॅनेलवरील पोस्टने पुतीन यांच्या तब्येतीबद्दल पोस्ट केली होती.
या पोस्टमध्ये पुतीन यांच्या छायाचित्रावर 'आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही जीवंत आणि सुस्थितीत असाल अशी देवाकडे प्रार्थना आहे.'

विशेष म्हणजे 2020 मध्ये पुतीन यांनी स्वत:च सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनाच भूतकाळात अशी ऑफर करण्यात आल्याचा खुलासा केला होता. अगदी अलीकडेच एप्रिलमध्ये पेस्कोव यांनी बॉडी डबलची संकल्पना फेटाळून लावली होती. यावेळी पुतीन अगदी ठणठणीत असल्याचा निर्वाळा दिला होता. राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्याबाबत समोर येणाऱ्या अफवांबाबत क्रेमलिनने सतत खंडन केले आहे. एप्रिलमध्ये पेस्कोव यांनी पुतीन कॅन्सरशी झुंज देत असल्याच्या अफवेचे खंडन केले होते. सीआयएचे संचालक विल्यम जे बर्न्स यांनी जुलैमध्ये सांगितले की, 'पुतीन हे अगदी ठणठणीत आहेत.'

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news