तलफ अशी की..! ऐन रामलीलेत स्टेजवरच रावणाने खाल्ला गुटखा | पुढारी

तलफ अशी की..! ऐन रामलीलेत स्टेजवरच रावणाने खाल्ला गुटखा

पुढारी ऑनलाईन : अनेकांना कशाच ना कशाचं व्यसन असतं. या व्यसनापायी अनेकजण विविध समस्यांनाही तोंड देत असतात. पण अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हीडियोने मात्र हसून हसून तुमच्या पोटात दुखल्याशिवाय राहणार नाही. कालच देशभरात दसऱ्याचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला गेला. या दिवशी उत्तर भारतासह देशातील अनेक भागात रामलीलेचं आयोजन केलं जातं. या दरम्यान एक व्हीडियो मात्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हीडियोमध्ये रामलीला सुरू असतानाच रावण चक्क गुटखा खाताना दिसतो आहे.

विशेष म्हणजे रावणवधाच्या काही मिनिटांपूर्वीच हा व्हिडीओ काढला आहे. हा व्हीडियो X या प्लॅटफॉर्मवरुन व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हीडियो पाहून नेटिझन्स मात्र भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत. एकजण म्हणतो, ‘या रावणाला वधाची गरज नाहीच.. हा तर रजनीगंधा खाऊनच मरेल. तर एकजण म्हणतो कि कदाचित ही रावणाची शेवटची इच्छा असेल.

हेही वाचा : 

Back to top button