पुढारी ऑनलाईन: इराणमधील महसा अमिना या महिलेला हिजाब व्यवस्थित न घातल्या कारणाने अटक करण्यात आली. यानंतर अमानुषपणे तिला मारहाण करत तिची हत्या करण्यात आली होती. घटनेवरून इराणमधील तरूणींसह देशभरात हिजाबविरोधी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाला चळवळीचे स्वरूप आले. त्यामुळे इराणमधील वातावरण दिवसेंदिवस हिंसक बनत चालले होते. अखेर इराण सरकारनेच जनतेसमोर झुकले आहे. देशातील देशातील नैतिक पोलिस दलच बरखास्त करण्याची घोषणा सरकारने केली आहे. स्थानिक प्रसार माध्यमांनी रविवारी (दि. 4) याबाबतची माहिती दिली आहे.
हिजाब व्यवस्थित न घातल्याच्या कारण सांगत तेहरानमधील नैतिक पोलिसांनी २२ वर्षीय महसा अमिना हिला अटक केली होती. पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर युवक, युवती आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरत तीव्र निदर्शने केली होती. देशातील हिजाब घालण्याच्या पद्धतीचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसाला हिला अटक केली होती. तिला अटक करणारे नैतिक पोलिस दलच आता इराण सरकारने बरखास्त करण्याची घोषणा केली आहे.
इराणमध्ये १६ सप्टेंबरपासून निदर्शने सुरू झाली. यामध्ये ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर हिजाबविरोधी आंदोलनादरम्यान १४ हजारहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. इराणमधील अनेक कार्यकर्ते आणि तज्ञांनी या निषेधांना राष्ट्रीय क्रांती म्हणून संबोधले आणि इराण सरकारसाठी हे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले. इराणमध्ये निर्माण झालेले हिंसक वातावरण थांबविण्यासाठी आणि या घटनेवर कायमचा पडदा टाकण्यासाठी इराण सरकारने 'नैतिक पोलिस' दल बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेेतला.
ISNA या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नैतिक पोलिसांचा न्यायपालिकेशी काहीही संबंध नाही. इराणच्या ॲटर्नी जनरलने एका परिषदेत नैतिकता पोलिस का बंद करण्यात आली याचे विश्लेषण दिले. तेव्हा त्यांनी सांगितले की, गश्त-ए इरशाद म्हणून ओळखले जाणारे इराणचे कट्टर राष्ट्राध्यक्ष मेहमूदक अहमदीनेजाद यांच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आली होती. तेव्हा या नैतिक पोलिसचा हेतू हा हिजाबचा प्रचार प्रसार करणे हा याचा एकमेव उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.