पुढारी ऑनलाईन डेस्क : राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून नेत्रा वाचवू शकेल का? हे २१ जानेवारीच्या ' सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये चाहत्यांना पहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंंधित बातम्या
नेत्राचा रूपालीविषयी संशय वाढल्याने ती घरातल्या सर्वांना रूपालीच विरोचक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. तसेच नागापासून आणि रूपालीपासून सावध रहायला सांगते. विरोचकाचा सेवक असलेला नाग घरातच कुठेतरी असल्यामुळे अस्तिकासुद्धा नाग पकडण्याच्या प्रयत्नात आहे, असं घरच्यांना सांगते.
इकडे अस्तिका नागाच्या रूपात घरात सर्व संचार करून राजाध्यक्ष कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. नेत्रा, शेखर आणि इंद्राणीला सांगते की, त्रिनयना देवी आणि विरोचकाचं युद्ध जसं त्रेतायुगात झालं होतं. तसं ते कलियुगात नसेल.
कलियुगात हे युद्ध अतिशय कठीण असणार आहे. कदाचित अस्तिकाचं या घरात येणं, विधिलिखित असेल आणि त्रिनयना देवीनेच तिला येथपर्यंत आणलं असेल, नेत्राचं हे बोलणं अस्तिका नागाच्या रूपात ऐकते. आणि म्हणते की, नेत्रा तू चाणाक्ष आहेस, तू बरोबर ओळखलंस आपला संबंध त्रेतायुगातला आहे. नाण्याची एक बाजू तू बरोबर ओळखली आहेस. पण, दुसरी बाजू ओळखायला तुला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत.
नेत्रा मात्र, विरोचकाच्या सेवकापासून राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. तसेच कलियुगातील विरोचकाचा पराभव करण्यासाठी इतर अजून काय मार्ग असू शकतात याविषयी इंद्राणीबरोबर चर्चा करते. आता नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून कशी वाचवते? हे महाएपिसोडमध्ये कळणार आहे. यामुळे नका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.