Album Vishwamitra
Album Vishwamitra

Album Vishwamitra : ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉन्गचा ट्रेलर प्रदर्शित (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'विश्वमित्र' या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर गायक अवधूत गुप्ते यांनी एक पोस्ट शेअर केली होती. तर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिल्या `विश्वमित्र' या गाण्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा काळे यांच्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. गाणे जरी रांगड्या मातीतील असले तरी या गाण्यातून दोघांची हळुवार सुरू होणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यांची ही प्रेमाची गोष्ट येत्या १९ जानेवरीला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ( Album Vishwamitra )

संबंधित बातम्या 

एकविरा म्युझिक प्रस्तुत 'विश्वमित्र' या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.`विश्वमित्र`हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायिले असून या गाण्याला संगीत आणि बोलही त्यांचेच लाभले आहेत. ( Album Vishwamitra )

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते यांनी सांगितले की, "आमच्या अल्बममधील टायटल सॉन्ग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील राकड, रांगडे शब्द लोकांना भावणारे आणि आपलेसे करणारे आहे. गावाकडे सऱ्हास वापरले जाणारे हे बोलीभाषेतील शब्द गाण्यात एक गावरान तडका आणत आहेत. या गाण्यातून एक कथा उलगडत आहे.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news