Chess World Cup Final: प्रग्नानंदची कार्लसनला कडवी टक्कर, पहिला गेम ड्रॉ

Chess World Cup Final: प्रग्नानंदची कार्लसनला कडवी टक्कर, पहिला गेम ड्रॉ

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय ग्रँडमास्टर आर प्रग्नानंद आणि नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात खेळवण्यात येत आहे. सामन्यात आज (दि.२२) पहिल्या गेममध्ये भारताच्या १८ वर्षाच्या प्रग्नानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला चांगलीच टक्कर दिली. आघाडीवर असलेल्या प्रज्ञानंदने कार्लसनचे टेन्शन वाढवलं होतं. मात्र आपला अनुभवपणाला लावून कार्लसनने पिछाडी भरून काढत सामना ड्रॉ केला. उद्या (दि.२३) सामन्यातील दुसरा गेम खेळवण्यात येणार आहे. (Chess World Cup final 2023)

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news