नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: लखीमपूर खीरी येथे भाजप नेता आशिष मिश्र याच्या गाडीखाली चिरडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मिश्र याच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्र याचा जामीन अर्ज मंजूर केला होता. त्यानंतर आशिष तुरुंगातून बाहेर आला होता.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखीमपूर खिरी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष यांना मिळालेल्या जामिनाला विरोध करीत याआधीच सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यात आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी देखील याचिका दाखल केल्याने आशिष मिश्र यांच्या अडचणीत भर पडली आहे.
लखीमपूर खीरी येथील घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने आरोपीला जामिन देताना त्याने केलेल्या गुन्ह्याकडे गंभीरतेने पाहिले नाही. राज्य सरकारने त्या निर्णयाविरोधात अपील करावयास हवे होते, पण, तसे करण्यात आले नाही, असे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचलंत का?
(video : मी नथुरामच्या व्यक्तिरेखेचं समर्थन करत नाही )