औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण ; शेवगावात दोन युवकांना अटक

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण ; शेवगावात दोन युवकांना अटक
Published on
Updated on

शेवगाव तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. या घटनेने गुरूवारी रात्री शहरात तणाव निर्माण झाला मात्र, शुक्रवारी हा तणाव काहीसा निवळल्याचे चित्र होते. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. या घटनेत रेहान मुबारक सय्यद व रिजवान मुबारक सय्यद (दोघे रा. ईदगाह मैदान, शेवगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरात गुरूवारी (दि.8) दुपारी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे निदर्शनास येताच जमाव होऊ लागला. एका जमावाने स्टेटस ठेवणार्‍या युवकाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

रात्री जमाव वाढत होता. मात्र, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सदर अपप्रवृत्तीच्या युवकांनी हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने, दोन समाजात वाद होऊन शत्रुत्व निर्माण होण्याच्या द्वेष भावनेने औरंगजेबचा फोटो स्टेटसवर ठेवून 'सबके पापा औरंगजेब आलमगीर' असा मजकूर स्टेटसवर प्रसारित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल बप्पासाहेब धाकतोडे यांनी फिर्याद दिली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 14 मे रोजी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दगडफेकीची घटना होऊन मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी जमावाने तोडफोड, जाळपोळीचे प्रकार केले. याबाबत सुमारे सव्वादोनशे समाजकंटकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यातील 47 दंगेखोरांना अटक झाली असून, अन्य पसार झालेले आहेत. या घटनेला तीन आठवडे उलटल्यानंतर आता हळूहळू शहराची परिस्थिती पूर्वपदावर येत असताना, दोन अपप्रवृत्तीच्या युवकांनी गुरूवारी मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा शहरात तणाव निर्माण झाला आहे.

शेवगावनंतर अहमदनगर, समनापूर, कोल्हापुर या ठिकाणी वेगवेगळ्या अनुचित घटना घडल्याने राज्याचे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. असे प्रकार घडू नयेत, यासाठी खरबरदारी घेतली जात आहे. असे असताना शेवगावात काही अपप्रवृत्ती जाणूनबुजून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्टेटसच्या घटनेवरून लक्षात येत आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news