David Warner : माझ्यावरील बंदी प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले

David Warner : माझ्यावरील बंदी प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. संघातील सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट बोर्डावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'सिडनी हेराल्ड'ला दिलेल्या एका मुलाखतीत वॉर्नरने त्याच्या कर्णधारपदाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली. बोर्डाने माझे कर्णधारपद बंदी प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ते अपमानास्पद होते. बोर्डाने हे प्रकरण मिटवण्याऐवजी अधिक खेचले, ही गोष्ट फार निराश करणारी होती. असे झाले नसले पाहिजे होते, असे वॉर्नर मुलाखतीत म्हणतो. (David Warner)

ऑस्ट्रेलिया क्रिकेटने 2018 साली वॉर्नरवर नेतृत्व करण्यावर आजीवन बंदी घातली होती. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये काही बदल केले होते. ज्यामुळे वॉर्नरने स्वत:वरील बंदी हटवण्यासाठी याचिका केली होती. मात्र, बोर्डाने त्याच्या याचिकेवर अद्याप पूर्णपणे कोणताही निकाल दिलेला नाही. (David Warner)

वॉर्नर म्हणतो की, या संपूर्ण प्रकरणामुळे मला खेळावर लक्ष केंद्रित करता येत नाही. कसोटी मॅचदरम्यान मला फोन येत असतात आणि माझे लक्ष खेळाऐवजी वकिलांशी बोलण्याकडे जात आहे. हे माझ्यासाठी अपमानास्पद आहे आणि यामुळे फार निराशादेखील आली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नरने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात याचिका दाखल केली होती. त्यात त्याने कर्णधारपदावर लावण्यात आलेली बंदी हटवण्याची मागणी केली होती. माझा हेतू त्यांचा अपमान करण्याचा नाही. मी पॅनलकडे विनंती करतो की, माझी सुनावणी एका बंद खोलीत व्हावी; पण त्यांना ही सुनावणी सार्वजनिक स्वरूपात करायची आहे. हे अजिबात योग्य नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण

हे संपूर्ण प्रकरण 2018 सालचे आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेला होता. तेव्हा सॅड पेपर गेट कांड झाले होते. या घटनेत कॅमरून बॅनक्रॉफ्टला चेंडूवर काही तरी घासताना पाहिले गेले. नंतर असे लक्षात आले की, तो बॉल टेम्परिंग करत होता आणि यात कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचादेखील सहभाग होता. तेव्हा स्मिथ कर्णधार आणि वॉर्नर उपकर्णधार होता. या दोघांना पदावरून हटवण्यात आले आणि प्रत्येकी 1 वर्षाची बंदी घालण्यात आली; तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली. या कारवाईत वॉर्नरला आजीवन नेतृत्व करण्यापासून रोखण्यात आले.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news