ठरलं तर मग : अर्जुन सुभेदार साकारण्यासाठी अमित भानुशालीने घटवलं १७ किलो वजन

अमित भानूशाली
अमित भानूशाली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ठरलं तर मग मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार असून या भूमिकेसाठी त्याने तब्बल १७ किलो वजन कमी केलं आहे. ९ वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात अमित भानुशालीने दमदार कमबॅक केले आहे.

ठरलं तर मग मालिकेताल भूमिकेविषयी अमित म्हणाला, मी अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आता पर्यंत मी रोमँटिक हिरोची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकीत वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत. स्टार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे.

आपल्या आयुष्यातील 'ठरलं तर मग' क्षणाबद्दल तो म्हमाला- ठरलं तर मग हे तीन खूप सोपे शब्द वाटतात. या तीन शब्दांचा वापर आपण नेहमीच करत असतो. पण या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपण एखादा महत्त्वाचा निर्णय घेतो. मी शाळेमध्ये असताना खूप कमी बोलायचो. कॉलेजमध्येही तिच अवस्था होती. लोक माझ्या शांतपणावर हसायची. माझ्या शांतपणाचं कारण फक्त मलाच माहित होतं. मी बोलताना खूप भीतभीत बोलायचो. लोकं हसतील म्हणून मी बोलणच टाळायला लागलो. बाबांना जेव्हा याविषयी कळलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की लोक चांगल्या-वाईट प्रत्येक गोष्टीवर हसणारच. तेव्हा रडत बसू नकोस लढायला शिक.

माझ्या आयुष्यातला हाच ठरलं तर मग क्षण होता जेव्हा मी यातून बाहेर पडायचं ठरवलं. डिप्लोमा इन थिएटर्स करताना मला माझ्या गुरुंचीही खूप चांगली साथ मिळाली. आज तुमच्या समोर उभा असणारा हा अमित भानुशाली कोणतीही भाषा अस्खलित बोलू शकतो.
अर्जुन सुभेदार साकारण्यासाठी अमितने खूप मेहनत घेतली आहे. ठरलं तर मग मधला अर्जुन साकरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आव्हान होतं म्हणजे वजन कमी करण्याचं. या भूमिकेसाठी त्याने जवळपास १७ किलो वजन कमी केलं आहे. भूमिकेची तशी गरज होती.

अर्जुन वकील जरी असला तरी त्याला खेळाची आणि फिटनेसची आवड आहे. खऱ्या आयुष्यातही फिटनेसच्या बाबतीत तो खूपच जागरुक असतो. शूटिंगचा कॉल टाईम कितीचाही असला तरी त्याआधीचे दोन तास तो जिमसाठी देतोच. शाळेत असल्यापासूनच फिटनेसचं वेड त्याला आहे. याचा उपयोग त्याला ही व्यक्तिरेखेसाठी सुद्धा झालाय. मालिकेत अर्जुनचे बरेचसे सीन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, यातून त्याचं फिटनेसविषयीचं प्रेम अधोरेखित होईल.

या मालिकेत अमित आणि जुई गडकरीची केमिस्ट्री जुळलीय. जुई आणि मी शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा भेटलो तेव्हा फारसा संवाद झाला नाही. जुईला विचारलं तू अशीच शांत असतेस का? तेव्हा जुईने सांगितलं की- नव्या टीमसोबत मिसळायला थोडा वेळ लागतो असं सांगितलं होतं. आता मात्र जुई आणि त्याची छान मैत्री झाली आहे. सेटवर सगळेच सहकलाकार खूप धमाल करतात.

अमित म्हणाला, आमच्या निर्मात्या म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत मी एक हिंदी मालिकेत काम केलं होतं. सुचित्रा ताई सहकलाकार म्हणून उत्तम आहेतच पण निर्माती म्हणूनही त्यांच्यासोबत काम करताना धमाल येतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं. शूट संपल्यानंतरही घरी जायची इच्छा होत नाही. सहकलाकारांसोबत छान मैत्री झाली आहे. मुळात आमच्या सेटवर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच सीन करताना मजा येते. पडद्यामागचा हा घट्ट बंध प्रेक्षकांना मालिका बघतानाही जाणवेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news