संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिस नाशकात, चौकशी सुरु

Sanjay Raut
Sanjay Raut

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका जामिनावर सुटलेल्या राजा ठाकूर या गुंडाला मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र शिवसेना खासदार संजय राऊत (ठाकरे गट) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस आयुक्त यांना लिहलं आहे. राऊतांच्या या पत्रानंतर  चांगलीच खळबळ उडाली आहे.

यापार्श्वभूमीवर कालपासूनच संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी ठाण्याचे पोलिस पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या पथकात एसीपी दर्जाच्या अधिका-यासह सात जणांचा समावेश असून नाशिकमध्ये ज्या हॉटेलमध्ये संजय राऊत थांबले आहेत त्या हॉटेलच्या रुममध्ये त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना लिहलेलं पत्र व नाशिकमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात झालेलं आंदोलन तसेच व काही कार्यकर्त्यांनी त्यांना नाशिकमध्ये फिरु देणार नाही असेही म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिस दलातील कर्मचारी राऊत यांच्या सुरक्षेसाठी हॉटेल बाहेर थांबले आहेत. नाशिक पोलिसांनी संजय राऊत यांना सुरक्षा पुरविली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news