हवाई सुंदरीने दिल्या विमान प्रवासासाठी टिप्स | पुढारी

हवाई सुंदरीने दिल्या विमान प्रवासासाठी टिप्स

नवी दिल्ली : सिएरा मिस्ट नावाच्या हवाई सुंदरीने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये तिने प्रवाशांना काही ‘बेसिक’ टिप्स दिल्या आहेत. यापैकी काही टीप्स विचित्र वाटणार्‍याही आहेत! त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

या व्हिडीओच्या सुरुवातीला ती सांगते की कशाप्रकारे आपण आपल्याजवळ काही ‘बेसिक’ गोष्टी ठेवल्या पाहिजेत जसे की, खाण्याचे सामान. तिने सांगितले की, जर का तुम्ही छोट्या किंवा मोठ्या प्रवासासाठी विमानातून प्रवास करणार असाल तर तुम्ही तुमच्याजवळ काहीतरी खाण्याचे सामान ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवासात काही अडचण येणार नाही. अनेकदा फ्लाईट ही लेटही होते त्यामुळे आपल्याला अशावेळी आपल्यासोबत काहीतरी खायला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तिने दुसरी टिप ती जी सर्वात महत्त्वाची आहे असे ती म्हणते, तिने सांगितले की, तुम्ही फ्लाईटमध्ये बसल्यावर कधीही टॉयलेटला जाऊ नका कारण असे केल्याने हवाई सुंदरी यांना प्रवाशांचे काऊंटिंग करताना म्हणजेच प्रवाशांची संख्या मोजताना अडथळे येतात.

तेव्हा फ्लाईटमध्ये बसल्यावर अजिबातच टॉयलेटला जाऊ नका आणि शक्यतो टाळा. कुठेतरी एअरपोर्टवरच तुम्ही फ्रेश होऊ शकता. तिसरी टिप तिने अशी दिली की, फ्लाईटमध्ये तुम्ही चपला काढून बसू नका कारण त्याने तुमच्या पायांना नुकसानही होऊ शकते. एकतर केबिनच्या प्रेशरमुळे तुमचे पाय सुजूही शकतात. त्याचबरोबर तुमच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही त्याचा त्रास होऊ शकतो.

Back to top button