पुढारी ऑनलाईन डेस्क ; थायलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत ( Thailand Election ) लष्कर राजवटीविरोधातील विरोधी पक्षांचा मोठा विजय मिळाला आहे. आतापर्यंत झालेल्या ९९ टक्के मतमोजणीत विरोधी पक्ष प्रोग्रेसिव्ह मुव्ह फॉरवर्ड पार्टी आणि पॉप्युलिस्ट फाययू थाई पार्टी यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, लष्कर नियुक्त सिनेटच पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेणार असल्याने थायलंडमधील लष्कर राजवट संपुष्टात येणार का, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
थायलंडमध्ये रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी लष्करी राजवटीपासून मुक्त करण्याची ग्वाही दिली होती. तसेच देशातील राजेशाही कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासनही दिले होते. थायलंडमधील सुरुवातीचे निवडणूक निकाल हे प्रोग्रेसिव्ह मूव्ह फॉरवर्ड पार्टी ४०० पैकी ११३ जागावर बाजी मारली आहे तर पॉप्युलिस्ट फाययू थाई पार्टीने सुमारे ११२ जागांवर जिकेल, हे आता स्पष्ट होत आहे.
थायलंड निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ९९ टक्के प्राथमिक निकाल जाहीर झाले आहेत. देशातील जनतेने गेली एक दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या लष्कर राजवटीविरोधात मतदान करत सुधारणावादी विरोधी पक्षांना कौल दिला आहे. प्रोग्रेसिव्ह मूव्ह फॉरवर्ड पार्टी (MFP) आणि पॉप्युलिस्ट फाययू थाई पार्टीने ५०० पैकी २८६ जागांवर विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आता या दोन्ही प्रमुख पक्षांना सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवणेही आवश्यक आहे. मात्र तरीही येथील नियमानुसार सत्तेची चावी थायलंडच्या लष्कराकडेच राहिल, असे मानले जात आहे.
थायलंडमधील लष्करीने केलेल्या व्यवस्थेनुसार, निवडणुकीनंतर २५० सदस्य असलेले सिनेटचा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवावा लागतो. सिनेटच पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाची निवड करते. सिनेटचे सदस्य निवडले जात नाहीत तर त्यांची नियुक्ती लष्करच करते. त्यामुळे विरोधी पक्षांना निवडणुकीत मोठे यश मिळाले असले तरी ते सरकार स्थापन करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पॉप्युलिस्ट फाययू थाई पार्टीहा थायलंडमधील सर्वात जुन्या पक्षांपैकी एक आहे. त्याचे संस्थापक देशातील ख्यातनाम उद्योगपती थाक्सिन शिनावात्रा आहेत. यापूर्वी त्यांनी थायलंडचे पंतप्रधानही भूषवले आहे. तसेच त्यांचे नातेवाईक यिंगलक शिनावात्रा यांचीही पंतप्रधान पदी निवड झाली होती. लष्कराने दोघांनाही सत्तेवरून बेदखल केले होते. आता थाक्सिन यांची मुलगी पैतोंगार्न शिनावात्रा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. प्रोग्रेसिव्ह मुव्ह फॉरवर्ड पार्टीचे नेते लिमजारोनरत हे देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. दोन्ही पक्षांनी युती होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा :