Rahul Bajaj : राहुल बजाज यांचे दहा प्रेरणादायी विचार

Rahul Bajaj : राहुल बजाज यांचे दहा प्रेरणादायी विचार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुल बजाज नेहमी आपल्या कार्याने आणि विचारांनी देशाला प्रेरणा देत राहिले. त्यांचे आचरण  करत भारतातील अनेक नवउद्योजकांनी आपल्या भविष्याला आकार दिला. बजाज समुहाला त्यांनी सर्वोच्च शिखरा पर्यंत पोहचवले.

राहूल बजाज (Rahul Bajaj) यांनी पाच दशकांहून अधिक काळ बजाज समुहाचे नेतृत्व केले. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. युपीएचे सरकार असताना ते राज्यसभेचे सदस्य होते. देशाच्या आर्थिक संकटाच्या काळात, मंदीच्या काळात त्यांनी सरकारला व देशाला मार्गदर्शन केले. उद्योग जगतासह सामाजिक, राजकीय क्षेत्रात आदराने त्यांचे नाव घेतले जात असे. त्यांनी त्याच्या मार्गदर्शनातून अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे विचार आज आपणास मार्ग दाखवतात. त्यांनी दिलेले हे दहा विचार महत्त्वाचे विचार.

राहूल बजाज यांचे दहा प्रेरणादायी विचार (Rahul Bajaj)

  • "पूर्वी संस्थांनी व्यक्ती घडवल्या, आज व्यक्ती संस्था बनवतात."
  • "आपण सर्वांनी प्रामाणिकपणे, नैतिकतेने वागणे आणि आपले सर्व पर्याय जाणीवपूर्वक निवडणे हे अधिक महत्त्वाचे आहे."
  • "जेव्हा आपण आपल्या देशातून भ्रष्टाचार संपवू, तेव्हा आपण खरे, अभिमानी आणि स्वतंत्र राष्ट्र असू."
  • "विनाकारण काळजी करत बसल्याने काही मिळत नाही, पण कष्ट केल्याने काहीतरी साध्य होते."
  • "आपले राष्ट्र त्याच्या आकारमानामुळे किंवा लोकशाहीमुळे नव्हे, तर उत्कृष्ट उद्योजक आणि कष्टाळू लोकांमुळे मोठा होत आहे."
  • "आरक्षण हे अंतिम ध्येय आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगू शकतो की सक्तीच्या आरक्षणाला माझा पूर्ण विरोध आहे."
  • "विश्वासार्हता तुमच्या ट्रॅक रेकॉर्डवर अवलंबून असते, मग ती वैयक्तिक असो वा कॉर्पोरेट किंवा सरकारी…"
  • "जोपर्यंत भारतातील शिक्षणाचा प्रश्न आहे, या क्षेत्रात आपण अद्याप ब्रँड तयार केलेला नाही."
  • "तुमचा व्यवसाय सार्थकी लागला पाहिजे. तुम्ही विहीर खोदून सांगू शकता की मी देशात रोजगार देतो. पण ते निरर्थक आहे."
  • "नफा आणि रोजगार हे महत्त्वाचे उत्पादन आहेत. तुम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत नसल्यास, तुम्ही नफा कमवू शकत नाही किंवा नोकऱ्या निर्माण करू शकत नाही."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news