Telangana home minister : पुष्पगुच्छ देण्यास वेळ झाला…तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी सुरक्षा गार्डला लावली थप्पड

telangana home minister
telangana home minister

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Home Minister Mohammad Mahmood Ali) यांनी शुक्रवारी आपल्याच सुरक्षा रक्षकाला (गनमॅन) थप्पड लगावलं. पुष्पगुच्छ देण्यास वेळ झाला म्हणून त्यांनी थोबाडीत लगावल्याचे समोर आले आहे. आता तेलंगणाचे गृहमंत्री वादात सापडले आहेत.

संबंधित बातम्या –

गनमॅन सुरक्षा रक्षकाने वेळेवर पुष्पगुच्छ दिला नाही, म्हणून त्याला कानाखाली लगावल्याचे समोर आले आहे. ही घटना हैदराबादमध्ये तेव्हा घडली, जेव्हा मोहम्मद महमूद अली हे पशुपालन मंत्री टी. श्रीनिवास यादव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास पोहोचले. यानंतर दोन्ही मंत्री सीएम ब्रेकफास्ट स्कीमच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी सहभागी होणार होते.

गृहमंत्र्यांनी गनमॅनला थप्पड मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, गृहमंत्री त्याला कानशिलात लगावताना दिसत आहेत. गृहमंत्रीने येताच श्रीनिवास यादव यांची गळाभेट घेऊन जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, सुरक्षा रक्षकाने वेळेवर पुष्पगुच्छ न दिल्याने गृहमंत्र्यांनी अचानकपणे त्याला मारले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news