हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ४ वर्षाच्या मुलासह ७ जणांचा मृत्यू

Heavy rain
Heavy rain

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका घराची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

हैदराबादमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येलाही सामोरे जावे लागले आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपत्ती निवारण दल पाणी साचलेल्या भागात पाठवण्यात आले आहे, जे पाण्याचा निचरा करण्याचे आणि कोसळलेली झाडे काढण्याचे काम करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news