Tech layoffs in 2023 | धक्कादायक! गतवर्षात इन्फोसिस, TCS, विप्रो, टेक महिंद्रामधून ६७ हजार जणांना नारळ

Tech layoffs in 2023 | धक्कादायक! गतवर्षात इन्फोसिस, TCS, विप्रो, टेक महिंद्रामधून ६७ हजार जणांना नारळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील टेक कंपन्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची घोषणा केली. त्यामुळे सन 2023 हे वर्ष जगभरातील टेक व्यवसायिकांना आव्हानात्मक ठरले. देशभरातील इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि टेक महिंद्रा या चार दिग्गज कंपन्यांनी तब्बल ६७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Tech layoffs in 2023)

Tech layoffs in 2023: जगभरातील नोकरकपातीच्या लाटेची भारतीयांनाही झळ

गतवर्ष 2023 ची सुरूवातच एका भयानक नकारात्मकतेने झाली. दरम्यानच्या काळात अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची घोषणा करण्यास सुरुवात केली. ट्विटर (सध्याचे 'X'), मेटापासून गुगल, अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट पर्यंत अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. या संदर्भातील माहिती LinkedIn या सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली. भारतातील बऱ्याच कर्मचाऱ्यांनादेखील नोकरकपातीच्या लाटेचा सामना करावा लागला. या नंतर या कर्मचाऱ्यांनी नवीन नोकरी शोधण्यासाठी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला. (Tech layoffs in 2023)

सर्वाधिक इन्फोसिसने 24,182 कर्मचाऱ्यांना काढून टाकले

'Mint' च्या अलीकडील एका अहवालात असे दिसून आले आहे की, "2023 या केवळ एका वर्षात इन्फोसिस, टीसीएस, विप्रो 67 आणि टेक महिंद्रा यांसारख्या 4 दिग्गज आयटी कंपन्यांनी हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अहवालात पुढे असे दिसून आले आहे की, इन्फोसिसने 24,182 कर्मचाऱ्यांना काढून टाकले, तर विप्रोने 21,875 कर्मचाऱ्यांना गुलाबी स्लिप दिली. दुसरीकडे, TCS ने 10,818 लोकांचा निरोप घेतला तर टेक-महिंद्रा कंपनीने 10,669 लोकांना काढून टाकले आहे. (Tech layoffs in 2023)

टेक कंपन्यांमधील नोकरभरतीची गती मंदावली

टेक क्षेत्रातील नोकरदारांना गेल्या वर्षभरात टाळेबंदी हा एकमेव धक्का होता का? तर खरंच नाही. Mint च्या अहवालात Naukri.com चा हवाला देण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, आयटी कंपन्यांनी नोकरकपातीव्यतिरिक्त नवीन नोकरभरतीची गतीदेखील गेल्या वर्षभरात कमी केली आहे. डिसेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये, उमेदवारांना देण्यात आलेल्या नोकरीच्या ऑफरच्या संख्येत 21 टक्क्यांनी घट झाली आहे, असे देखील Mint च्या अहवालात म्हटले आहे.

फ्रेशर्सच्या सॅलरी पॅकेज ऑफरमध्येही कपात

नोकरकपात व्यतिरिक्त कंपन्यांनी त्यांचे खर्च कमी करण्यासाठी टेक कंपन्यांनी इतर पावलेदेखील उचलली. विप्रोने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये फ्रेशर्सच्या जॉब ऑफर जवळजवळ 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. टेक जायंटने सुरुवातीला फ्रेशर्सना 6.5 लाख रुपयांचे सॅलरी पॅकेज ऑफर केले होते. तथापि, 'बदलणारे मॅक्रो वातावरण' हे कारण सांगून, कंपनीने नमूद केले की ते फ्रेशर्सच्या पॅकेजमध्ये बदल करत आहेत. अहवालात असेही जोडले गेले होते की, कंपन्या नवीन ऑफर स्वीकारण्यास तयार नाहीत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news