न्‍यूझीलंडचा पराभव भारताच्‍या पथ्‍यावर!, WTC Points Table मध्‍ये टीम इंडिया अव्‍वल स्‍थानी

ऑस्‍ट्रेलियाने न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या दोन सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेत पहिल्‍या सामन्‍यात विजय मिळवला आहे. वेलिंग्‍टनमध्‍ये झालेल्‍या सामन्‍यात न्‍यूझीलंडला १७२ धावांनी पराभव झाला.
ऑस्‍ट्रेलियाने न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या दोन सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेत पहिल्‍या सामन्‍यात विजय मिळवला आहे. वेलिंग्‍टनमध्‍ये झालेल्‍या सामन्‍यात न्‍यूझीलंडला १७२ धावांनी पराभव झाला.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियाने न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या दोन सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेत पहिल्‍या सामन्‍यात विजय मिळवला आहे. वेलिंग्‍टनमध्‍ये झालेल्‍या सामन्‍यात न्‍यूझीलंडला १७२ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ( WTC Points Table ) फायदा झाला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकत या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ( Team India's No. 1 WTC after Australia's win against New Zealand )

WTC Points Table : गुणतालिकेची स्‍थिती

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडच्या गुणांची टक्केवारी 75 वरून 60 वर घसरली आहे. त्याने आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत. न्‍यूझीलंड संघाला एक पराभव पत्करावा लागला आहे. त्‍यामुळे हा संघ आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. सध्‍या भारताची गुणांची टक्केवारी 64.58 आहे. टीम इंडियाने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत तर दोन सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताचे ६२ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची स्कोअरिंग टक्केवारी 59.09 आहे. त्याला 78 गुण आहेत. ऑस्‍ट्रेलियाने आतापर्यंत 11 कसोटी खेळल्या असून सात जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्‍यात पराभूत झाला असून, एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. ( Team India's No. 1 WTC after Australia's win against New Zealand )

बांगलादेश 50 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर तर 36.66 गुणाच्‍या टक्‍केवारीसह पाकिस्तानची पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज ३३.३३ गुणांच्या टक्केवारीसह सहाव्या, दक्षिण आफ्रिका २५ गुणांच्या टक्केवारीसह सातव्या स्‍थानावर आहे. ( Team India's No. 1 WTC after Australia's win against New Zealand )

इंग्‍लडची आठव्‍या स्‍थानावर घसरण

चौथ्या कसोटीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंडच्या गुणांची टक्केवारी 19.44 आहे. WTC Points Table मध्‍ये  संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. 2023-25 ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीमध्‍ये इंग्लंडने आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले आहेत. यातील तीन जिंकले आहेत. पाच सामने हरले असून एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. श्रीलंकेची गुणांची टक्केवारी शून्य असून ती नवव्या स्थानावर आहे. ( Team India's No. 1 WTC  )

… तर भारताचे पहिले स्थान अबाधित राहील

7 मार्चपासून धर्मशाला येथे भारताचा इंग्‍लंड विरुद्धच्‍या पाच कसोटी सामन्‍याच्‍या मालिकेतील पाचवा सामना होणार आहे. या सामन्‍यात भारताने विजय मिळवल्यास कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले जाईल. तथापि, पाचवी कसोटी अनिर्णित राहिल्यास किंवा इंग्लंड जिंकल्यास, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोघांसाठी गुणतालिकेत भारताला मागे टाकण्याची संधी असेल. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवार, ८ मार्चपासून क्राइस्टचर्चमध्ये सुरू होणार आहे.

ऑस्‍ट्रेलिया-न्‍यूझीलंड सामन्‍यात काय घडलं?

ऑस्‍ट्रेलिया विरुद्धच्‍या दोन सामन्‍यांच्‍या मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 383 धावा केल्या. ऑस्‍ट्रेलियाच्‍या कॅमेरून ग्रीनने झुंझार १७४ धावांची खेळी केली. मिचेल मार्शने 40 धावा केल्या. पहिल्‍या डावात न्‍यूझीलंडच्‍या मॅट हेन्रीने पाच बळी घेतले. न्यूझीलंडचा पहिला डाव 179 धावांवर आटोपला. ग्लेन फिलिप्सने 71 आणि मॅट हेन्रीने 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने चार विकेट घेतल्या.

कांगारूंकडे पहिल्या डावात 204 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 164 धावा केल्या. लिऑनने 41, ग्रीनने 34 आणि ट्रॅव्हिस हेडने 29 धावा केल्या. न्यूझीलंडकडून फिलिप्सने पाच विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 368 धावांची झाली. न्‍यूझीलंडसमोर सामना जिंकण्‍यासाठी 369 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९६ धावांवर गारद झाला. रचिन रवींद्रने 59, तर डॅरिल मिशेलने 38 धावा केल्या. नॅथन लायनने सहा विकेट घेतल्या.ऑस्ट्रेलियाने १७२ धावांनी विजय मिळवला. ग्रीन सामनावीर ठरला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news