पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वनडे वर्ल्डकपमधील१७ वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात झाला होता. या सामन्यात शुभमन गिलची अर्धशतकी आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर ७ गडी राखून विजय मिळवला. यासह टीम इंडियाने वर्ल्डकपमधील आपली विजय घौडदौड कायम राखत स्पर्धेतील सलग चौथा विजय साकार केला. (Virat Century Against Bangladesh)
बांगलादेशविरूद्धच्या दमदार विजयानंतरही टीम इंडिया स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचू शकली नाही. टीम इंडियाप्रमाणे न्यूझीलंडने ही स्पर्धेत चार विजय मिळवले आहेत. यामुळे टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांचे गुण समान आहेत. मात्र गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ रन रेटच्या बळावर गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. (Virat Century Against Bangladesh)
बांगलादेशला मात दिल्यानंतर भारतीय संघ आरामात गुणतालिकेत पहिले स्थान गाठेल असा अंदाज होता, पण असे झाले नाही. बांगलादेशविरूद्ध विजय मिळवूनही भारताला नेट रनरेट कमी असल्यामुळे दुस-याच स्थानी समाधान मानावे लागले. दरम्यान नेट रन रेट कमी असण्याला विराट कोहलीचे शतक कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
टीम इंडिया विजयाच्या अगदी जवळ असताना विराट 90 धावांवर खेळत होता. यावेळी विराट-राहूल जोडीने लवकरात लवकर सामना संपवणे महत्वाचे होते. जेणेकरून टीम इंडियाचा नेट रन रेट सुधारून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचेल. विराटचे शतक व्हावे म्हणून के.एल. राहूनने आक्रमक फटके न मारता संयमी खेळी करण्याला महत्त्व दिले. आणि विराटला जास्तीत-जास्त स्ट्राईक मिळण्यासाठी प्रयत्न केला. ज्यामुळे भारताने हा सामना 44 व्या षटकात जिंकला. जर हा सामना 40 षटकांपूर्वी जिंकला असता तर नक्कीच टीम इंडियाचा नेट रन रेटवर वाढला असता.
वन-डे वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत टीम इंडियाने 4 सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात 8 गुणांची कमाई झाली आहे. तर नेट रनरेट + 1.659 इतका आहे. न्यूझीलंडनेही चारपैकी चार सामने जिंकून 8 गुणांची कमाई केली आहे. त्यांचा नेट रनरेट + 1.923 आहे. या फरकामुळे न्यूझीलंड गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे.