कॉमनवेल्थ गेम्ससाठी टीम इंडियाच्‍या महिला संघाची घोषणा

Womens Cricket Team
Womens Cricket Team

पुढारी ऑनलाईन डेस्क: बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या २०२२च्या कॉमनवेल्थ गेम्स (राष्ट्रकुल स्पर्धा) साठी सोमवारी (दि.११) अखिल भारतीय महिला निवड समितीची बैठक झाली. यामध्ये महिलांच्या वरिष्ठ संघाची घोषणा 'बीसीसीआय'कडून करण्यात आली. भारतीय महिला क्रिकेट टीम कॉमनवेल्थ सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही 'बीसीसीआय' आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काॅमनवेल्‍थ  स्पर्धेत भारतासोबत 'अ' गटात ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तान हे संघ आहेत. श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना 'ब' गटात असतील. २९ जुलै २०२२ पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात भारत तीन सामने खेळणार आहे.

टीम इंडियाचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, एस. मेघना, तानिया सपना भाटिया (यष्‍टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्‍टीरक्षक), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.

राखीव: सिमरन दिल बहादूर, रिचा घोष, पूनम यादव.

भारताचे सामने

२९ जुलै ऑस्ट्रेलियाविरुद्‍ध एजबॅस्टनमध्ये'; ३१ जुलैला पाकिस्तानसोबत एजबॅस्टनमध्ये; ३ ऑगस्ट राेजी बार्बाडोससोबत एजबॅस्टनमध्ये

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news