सुप्रीम कोर्टात ‘तारिख पे तारिख’ चालणार नाही ! न्यायमूर्ती चंद्रचूड भडकले !

सुप्रीम कोर्टात ‘तारिख पे तारिख’ चालणार नाही ! न्यायमूर्ती चंद्रचूड भडकले !

पुढारी ऑनलाईन : कोर्ट केस दरम्यान वेळकाढूपणाचे अनेक किस्से आपण ऐकलेले किंवा सिनेमातून पाहिलेले असतात. याच गोष्टीशी संबंधित अभिनेता सनी देओलचा तारिख पे तारिख हा डायलॉगही अनेकांनी ऐकला असेल. पण सध्या ही डायलॉग डिलिव्हरी केली आहे चक्क न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी. वकिलांनी केसच्या दरम्यात सतत पुढच्या सुनावणीची तारीख कोर्टाकडून मागू नये. सुप्रीम कोर्टाला 'तारिख पे तारिख' अशी व्याख्या असलेलं कोर्ट बनवण्याची माझी अजिबात इच्छा नसल्याचं त्यांनी सांगितले.

दिवसाच्या सुरुवातीच्या काही नव्या केसेसमध्ये वकिलांकडून सतत पुढील सुनावणीसाठी तारीख मागितली जाते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'मागच्या दोन महिन्यात 3688 केसेसमध्ये वकिलांकडून स्थगितीचा प्रस्ताव दाखल केला गेला. न्यायमूर्तींच्या या खंडपीठात न्यायमूर्ती जे. बी पारदिवाला आणि मनोज मिश्रा हे देखील आहेत. ते म्हणाले, जोपर्यंत अत्यंत गरजेचे नसेल तोवर केसमध्ये स्थगिती आणू नये.

न्यायमूर्ती पुढे म्हणाले कि, वकिलांच्या संस्थांच्या मदतीने खालच्या न्यायालयात केस सुरू झाल्यानंतर नवीन खटले सूचीबद्ध करण्याच्या वेळांमधील अंतर कमी झालं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी स्थगितीच्या अर्जावर लक्ष ठेवून आहे. आजच्या दिवसात 178 स्थगिती अर्ज आले आहेत. सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या कालावधीत दिवसाकाठी सरासरी 150 स्थगिती अर्ज येत असतात. खंडपीठासमोर सूचीबद्ध झाल्यानंतर वकील स्थगिती अर्ज देतात. यामुळे बाहेरच्यासाठी हा एक चुकीचा संकेत जातो.'

सनी देओलचा डायलॉग : 

चंद्रचूड यांनी म्हणलेला डायलॉग हा अभिनेता सनी देओल याचा आहे. दामिनी सिनेमातील हा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे वकिलाच्या भूमिकेत असलेल्या सनीने न्यायालयाच्या वेळकाढूपणाबाबत संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news