Tamil Nadu News: तामिळनाडूत दाेन फटाका कारखान्यांमध्‍ये स्फोट; ९ कामगारांचा होरपळून मृत्यू

Tamil Nadu
Tamil Nadu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात दाेन फटाका करखान्यांमध्‍ये स्फोट झाला. आज (दि.१७) दुपारी झालेल्‍या  या दुर्घटनेत  ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती येथील पोलीस अधिकारी आणि अग्निशमन आणि बचाव विभागाने दिली. (Tamil Nadu News)

फटाक्याच्या कारखान्यात दोन फटाक्यांच्या युनिटमध्ये  स्फोट झाला. तमिळनाडूतील शिवकाशीमधील फटाका युनिटमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर कम्मापट्टी गावात फटाका युनिटला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही आग दुर्घटनेत एकूण ९  कामगारांचा होरपळून मृत्यू झाला,  अशी माहिती येथील पोलिस अधिकारी आणि अग्निशमन आणि बचाव विभागाने दिली. या संदर्भातील वृत्त स्थानिक माध्यमांनी दिली आहे.  (Tamil Nadu News)

संबंधित बातम्या :

विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचली. अग्निशम दलाकडून बचावकार्य सुरू असून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. परंतु फटाक्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Tamil Nadu News)

Tamil Nadu News: यापूर्वीच्या स्फोटात ७ जणांचा होरपळून मृत्यू

यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी तमिळनाडूतील (Tamil Nadu) विरागलूरमध्ये (जि. तिरुचिरापल्ली) अशाचप्रकारे फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट होऊन आग लागली. या स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news