पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपर्यंत आपण क्रिकेटप्रेमींच प्रेम वेगवेगळ्या स्वरुपात पाहत आलो आहे. पण आपल्या आवडत्या क्रिकेटरची खिल्ली उडवली म्हणून खून ( Tamil Nadu Murder) करण्या इतपत प्रेम! हो अशीच घटना एक घडली आहे. तमिळनाडू मध्ये. क्रिकेटर रोहित शर्माच्या फॅनने RCB ची खिल्ली उडवली. याचा राग विराट कोहलीच्या फॅनला आला. आणि " खिल्ली का उडवली" म्हणून त्याने डोक्यात बॅट घालत त्याचा खून केला.
तमिळनाडू राज्यातील अरियालूर जिल्ह्यातील क्रिकेटर रोहित शर्माच्या फॅनला आरसीबी टीमची चेष्टा करणं चांगलचं महागात पडलं आहे. आरसीबीची चेष्टा केली म्हणून रागाने एकाने आपल्या मित्राचा खून केला. या (Tamil Nadu Murder) आरोपीला पोलिसांना अटक केली आहे.