आसाम ते भूतान दरम्यान रेल्वेसेवा सुरु करण्यावर चर्चा सुरु : परराष्ट्र मंत्री

File Photo
File Photo

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : शेजारी देशांसोबत संपर्क यंत्रणा मजबूत करण्यावर भारताने भर दिला असून, आसाम ते भूतान दरम्यान रेल्वेसेवा करण्याच्या मुद्यावर उच्चस्तरीय चर्चा चालू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज (दि.७) माध्‍यमांशी बाेलताना दिली. ( Bhutan and Assam Rail link )

देशाच्या उत्तर सीमांसहित सर्व सीमांवरील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास केला जात असल्याचे सांगून जयशंकर पुढे म्हणाले की, शेजारी देशांसोबत भारत संपर्काचे जाळे वाढवत आहे. विशेषतः बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या देशांदरम्यानची संपर्क यंत्रणा वाढवली जात आहे. आसाम ते भूतान दरम्यान रेल्वेमार्ग सुरु करण्यावर विचार सुरु आहे. भारतीय पर्यटकांसाठी जास्त मार्ग उघडण्यास भूतान उत्सुक आहे. आसामच्या विकासासाठी ही बाब चांगली आहे.

Bhutan and Assam Rail link : म्यानमारसोबतची सीमा परिस्थिती आव्हानात्मक

म्यानमार सीमेवर स्थिती आव्हानात्मक असल्याचे जयशंकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भारत, म्यानमार आणि थायलंड दरम्यान होणाऱ्या महामार्गासंदर्भात ते म्हणाले की, म्यानमारमधील कायदा आणि सुव्यवस्थेमुळे  त्रिपक्षीय महामार्ग हे एक मोठे आव्हान आहे. आव्हानावर मार्ग काढण्यासाठी म्यानमारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा  सुरु आहे.

भारत-चीनमध्‍ये लवकरच होणार बैठक

यावेळी त्यांनी चीनसोबतच्या बिघडत चाललेल्या संबंधांवरही एस. जयशंकर म्हणाले की, भारत-चीन सीमेवरील चर्चा थांबलेली नाही. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. गेल्या तीन वर्षांत सीमेवरील तणावात आम्ही बरीच सुधारणा केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news