Asian Indoor Athletics Championships | आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप : तजिंदरपालसिंग तूरला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक
पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा चॅम्पियन तजिंदरपाल सिंग तूरने (Tajinderpal Singh Toor) 10 व्या आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (Asian Indoor Athletics Championships) गोळाफेकमध्ये (शॉटपुट) सुवर्णपदक पटकावले. कझाकस्तानमधील अस्ताना येथे ही स्पर्धा सुरू आहे.
2018 मध्ये तेहरान येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये तजिंदरपाल सिंगने 19.18 मीटर गोळा फेक करून रौप्य पदक जिंकले होते. शुक्रवारी, त्यांने (Tajinderpal Singh Toor) त्याच्या पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला, पण त्याच्या तिसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात 19.49 मीटरचा विजयी थ्रो करून चॅम्पियनशिपमधील पहिले-वहिले सुवर्णपदक जिंकले.
तर करणवीर सिंग हा 19 मीटरचा टप्पा ओलांडणारा आणि 19.37 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा क्रमांक मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला. कझाकस्तानच्या इव्हान इवानोव्हने 18.10 फेक करून कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, प्रवीण चित्रवेल, भारताचा राष्ट्रीय तिहेरी-उडी चॅम्पियन याने 16.98 मीटर झेप घेऊन रौप्य पदक जिंकले. चीनच्या ऑलिंपियन फॅंग याओकिंगने 17.20 मीटर झेप घेत सुवर्ण आणि दक्षिण कोरियाच्या यू ग्युमिनने 16.73 मीटरसह कांस्यपदक जिंकले. भारताच्या अरुण एबीने 15 स्पर्धकांमध्ये 14.12 मीटर झेप घेऊन 12वे स्थान मिळवले. (Asian Indoor Athletics Championships)
हेही वाचा