कबड्डीत पुण्याच्या महिलांची बाजी; राज्य ऑलिम्पिक कबड्डी क्रीडा स्पर्धा बारामतीत उत्साहात | पुढारी

कबड्डीत पुण्याच्या महिलांची बाजी; राज्य ऑलिम्पिक कबड्डी क्रीडा स्पर्धा बारामतीत उत्साहात

बारामती; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित राज्य ऑलिम्पिक कबड्डी क्रीडा स्पर्धेत पुरुष गटात मुंबई शहर, तर महिला गटात पुणे जिल्हा संघ विजयी झाला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. याप्रसंगी तहसीलदार विजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, स्पर्धा संयोजक सचीन भोसले, अर्जुन पारितोषिक विजेते शांताराम जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री बिले, राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब आव्हाड, दत्ता झिंजुर्डे, तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, महेश चावले आदी उपस्थित होते.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पुरुष वरिष्ठ गटात अहमदनगर जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, धुळे, नाशिक, ठाणे, अमरावती व वाशिम जिल्हा, तर महिला वरिष्ठ गटात पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, कोल्हापूर, रायगड, नागपूर व अमरावती जिल्हा हे संघ सहभागी झाले होते.

पुरुष गटात मुंबईचे वर्चस्व
रविवारी (दि. 8) झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष गटात मुंबई शहर संघ विजेता, तर मुंबई उपनगर उपविजेता ठरला. महिला गटातील पुणे जिल्हा विजेता, तर मुंबई शहर उपविजेते ठरले. पुरुष गटात नाशिक तृतीय स्थानी वाशिम चौथ्या स्थानी, तर महिला गटात मुंबई उपनगर तृतीय स्थानावर, तर कोल्हापूर चौथ्या स्थानी राहिले.

Back to top button