आयफोन मेकर Foxconnची भारतात मोठी गुंतवणूक, नवीन फॅक्टरीसाठी करणार ‘इतका’ खर्च

आयफोन मेकर Foxconnची भारतात मोठी गुंतवणूक, नवीन फॅक्टरीसाठी करणार ‘इतका’ खर्च
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आयफोनची निर्मिती करणारी तैवानची फॉक्सकॉन (Foxconn) कंपनी भारतात नवीन फॅक्टरी उभारण्यासाठी १,२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ही फॅक्टरी कंपनीची मालकी असलेल्या जमिनीवर उभारली जाईल, असे फॉक्सकॉनने म्हटले आहे. सर्वात मोठ्या आयफोन मेकर असलेल्या या कंपनीने ही माहिती नियामक फाइलिंगद्वारे उघड केली आहे.

हे पैसे 'ऑपरेशनल गरजांसाठी' गुंतवले जात आहेत, असे कंपनीने पुढे नमूद केले आहे. याचा अर्थ त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी त्यांना हे पैसे खर्च करावे लागतील. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने विविध एजन्सीच्या आधारे दिले आहे.

फॉक्सकॉन भारतातील उभारणी प्रकल्पात १.५ अब्जापेक्षा जास्त डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आखत असल्याचा दावा गेल्या वर्षी अनेक रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. हा प्रकल्प कंपनीच्या "ऑपरेशनल गरजां"साठीदेखील आहे. या प्रकल्पासाठी पैसा फॉक्सकॉनच्या होन हाय टेक्नॉलॉजी इंडिया मेगा डेव्हलपमेंट या भागाकडून देण्यात आले होते.

फॉक्सकॉन भारतात त्यांचा व्यवसाय वेगाने वाढवत आहे. गेल्या महिन्यात, फॉक्सकॉनने सांगितले होते की ते HCL समूहासोबत काम करण्यासाठी ३७.२ दशलक्ष डॉलर खर्च करेल. ते एकत्र मिळून भारतात एक सुविधा निर्माण करतील जिथे चिप्स पॅकेज्ड आणि चाचणी करता येतील. फॉक्सकॉनकडून वेदांता समुहासोबतची भागीदारी तोडण्याची घोषणा झाल्यानंतर ही घडामोड समोर आली होती.

आयफोन निर्मितीसाठी चीनला प्राधान्य दिले जात होते. कोरोनापासून दोन्ही देशांतील तणाव वाढला. तेव्हापासून सुरू असलेले निर्गुंतवणुकीचे धोरण अद्यापही कायम आहे. Foxconn ही आयफोनची निर्मिती करणारी मोठी कंपनी आहे. त्यांना निम्मा महसूल अ‍ॅपल कंपनीकडून मिळतो. फॉक्सकॉनने काही वर्षांपूर्वीच अ‍ॅपल फोननिर्मितीसाठी भारताला पसंती दिली. नुकताच आलेला आयफोन-१५ भारतातच तयार झाला आहे.फॉक्सकॉनला उत्पादन क्षमता दुप्पट करायची आहे. त्यासाठी भारताची निवड करण्यात आली आहे. कर्नाटकने ऑगस्ट महिन्यात फॉक्सकॉन ६० कोटी डॉलर गुंतवणार असल्याचे जाहीर केले होते. आयफोन आणि सेमीकंडक्टर उपकरणांची निर्मिती येथे केली जाणार आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news