china vs taiwan तैवानच्या हद्दीत चीनी विमानांची घुसखोरी

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

तैपई; पुढारी ऑनलाईन : एकीकडे रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्याने युद्धाचा भडका उडाला असून अवघे जग या घटनेने चिंतीत असताना चीन देखिल आपली खुमखुमी वर काढू पहात आहे. चीनच्या ( china vs taiwan ) ९ लढावू विमानांनी आज तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घुसखोरी केली आहे. याबाबतची माहिती तैवान संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.

तैवानच्या ( china vs taiwan ) मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ८ चीनी जे – १६ लढावू विमाने आणि एक वाय – ८ विमान अशा नऊ विमानांनी दक्षिण चीनी समुद्राच्या वरील भागात तैवानचे नियंत्रण असणाऱ्या बेटांच्या ईशान्य भागात गुरुवारी चीनी विमानांनी घुसखोरी केली.

मंत्रालयाकडून ( china vs taiwan ) असे ही सांगण्यात आले की, जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला तेव्हा चीनने देखिल तैवानच्या संरक्षण क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने या आधी देखिल असे प्रकार केले आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरच्या महिन्यात चीनच्या २७ विमानांनी तेवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. चीन अशा प्रकराच्या मोहिमा नियमितपणे आखत असल्याचा आरोप तैवानने केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news