रशिया-युक्रेन लष्करी कारवाईने भारतालाही दणका बसणार !

रशिया-युक्रेन लष्करी कारवाईने भारतालाही दणका बसणार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन-रशियाच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे जग चिंतेत आहे. कारण कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर अद्याप जग रुळावर येण्यापूर्वीच या दोन देशात युद्धाची कारवाई सुरू झाली. भारत हा जर्मनी आणि फ्रान्सनंतर युक्रेनला फार्मास्युटिकल उत्पादनं निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांवर या युद्धाचा व्यापक परिणाम होईल, असे काही अभ्यासक सांगत आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये (Ukraine) लष्करी कारवाई करण्याची घोषणा आज (गुरूवार) केली. त्यानंतर युद्ध सुरू झाले. रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रे हल्ल्याला सुरूवात केली. युद्धाचे तीव्र पडसाद जगभर उमटत असलेले, दिसत आहेत. युक्रेनला होणाऱ्या भारतीय निर्यातीतील बहुतांश भाग फार्मास्युटिकल्सचा आहे. दुसरीकडे, युक्रेन हा भारताला सूर्यफूल तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

भारत हा आशिया-पॅसिफिकमधील युक्रेनचा सर्वात मोठा पाचव्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. भारत आणि युक्रेनमधील संबंध बिघडल्यास, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारावरही याचा परिणाम होईल. युरोपीय देशात भारत औषध उत्पादने, अणुभट्ट्या आणि बॉयलर मशिनरी, यांत्रिक उपकरणे, तेलबिया, फळे, कॉफी, चहा आणि मसाले निर्यात करणारा प्रमुख देश आहे.

या भारतीय कंपन्यांची युक्रेनमध्ये कार्यालये

Ranbaxy, Dr Reddy's Laboratories आणि Sun Group यासारख्या अनेक भारतीय कंपन्यांची युक्रेनमध्ये प्रतिनिधी कार्यालये आहेत. प्रमुख औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युक्रेनमध्ये इंडियन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IPMA) ची स्थापना केली आहे.

भारत युक्रेनला करतो निर्यात

युक्रेन हा भारताचा सूर्यफूल तेलाचा प्रमुख निर्यातदार आहे. तसेच भारत अजैविक रसायने, लोह आणि पोलाद, प्लास्टिक, इतर रसायने हेही युक्रेनला निर्यात करतो.

हेही वाचलत का ?

पाहा व्हिडिओ :

  • एस. टी संपाच्या झळा | Pudhari Podcast

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news