Taali : सुष्मिता सेन श्रीगौरी सावंतच्या भूमिकेत, काय आहे श्रीगौरीची कहाणी?

sushmita sen
sushmita sen

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुष्मिता सेन स्टारर चित्रपट ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. (Taali ) हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमा वर प्रदर्शित होणार आहे. अर्जुन सिंग बरन आणि कार्तक डी निशानदार यांची निर्मिती आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांचे दिग्दर्शन आहे. क्षितिज पटवर्धन लिखित आणि अफीफा नाडियादवालाद्वाराची सह-निर्मिती आहे. (Taali )

या मालिकेत श्रीगौरी सावंतची भारतातील तृतीय लिंग योग्य ओळख मिळवून देण्यासाठी तिची धडपड दिसून येईल. या मालिकेत सुष्मिता सेनचे ट्रान्सजेंडर कार्यकर्ती म्हणून प्रभावी भूमिका निभावली आहे.

ताली- बजाऊँगी नाही , बजवाऊँगी श्रीगौरी सावंत यांच्या जीवनातील संकटे आणि संकटांवर प्रकाश टाकते. तिचे गणेश ते गौरी असे धाडसी रूपांतर आणि त्यामुळे तिला भोगावे लागलेला भेदभाव; तिचा मातृत्वाचा धाडसी प्रवास आणि संघर्ष यातून पाहायला मिळेल.

सुष्मिता सेनने श्रीगौरी सावंतच्या तिच्या दमदार व्यक्तिरेखेवर भाष्य केले. ती म्हणाली, "जेव्हा मला पहिल्यांदा 'ताली'ची भूमिका ऑफर करण्यात आली, तेव्हा मी मनातल्या मनात 'हो' म्हटलं, पण मला अधिकृतपणे टीममध्ये सामील व्हायला सहाहून अधिक महिने लागले. ही मोठी जबाबदारी पेलण्यास मी पूर्णपणे तयार आहे. मी माझे संशोधन केले आहे आणि मी या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. श्रीगौरी सावंत यांच्याशी माझे सखोल नाते आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे."

श्रीगौरी सावंत यांनी देखील सांगितले की, "माझ्या कथेला संवेदनशीलतेने हाताळल्याबद्दल मी तालीच्या संपूर्ण टीमची फार फार आभारी आहे. सुष्मिताला भेटल्यानंतर आणि संवाद साधल्यानंतर आणि तिने माझ्या सर्व बारकावे जिवंत करण्यासाठी किती मेहनत घेतली हे पाहिल्यानंतर, मी माझ्या स्वतःच्या पात्राला न्याय देऊ शकेन असे मला वाटले नाही. तिने माझा अनुभव अगदी प्रामाणिकपणे मांडला आहे. एक महत्त्वाची कथा दाखवल्याबद्दल मी निर्माते आणि शोच्या संपूर्ण टीमची आभारी आहे. हा केवळ माझा प्रवास नाही; हा माझ्या लोकांचा आणि माझ्या आजूबाजूच्या अनेक लोकांचा प्रवास आणि अनुभव आहे, जे समाजात मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत."

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news