T20 World Cup NAM vs SL : श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर नामिबियाच्या खेळाडूंना अश्रू अनावर!

T20 World Cup NAM vs SL : श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर नामिबियाच्या खेळाडूंना अश्रू अनावर!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup NAM vs SL : ऑस्ट्रेलियात आजपासून (रविवार) सुरू झालेल्या ICC T20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याचा निकाल धक्कादायक लागला. सलग पाच सामने जिंकून आशियाई चॅम्पियन बनलेल्या श्रीलंकेच्या संघाला टी 20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात पराभवाने करावी लागली. अ गटातील पहिल्या फेरीत त्यांना नामिबियाने 55 धावांनी धोबीपछाड देत ऐतिहासिक विजय नोंदवला.

केवळ दुसऱ्यांदा नामिबियाविरुद्ध खेळणाऱ्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात जबरदस्त झाली आणि त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत नामिबियाच्या सहा फलंदाजांना 93 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र यानंतर नामिबियाच्या फलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत संघाची धावसंख्या 163 पर्यंत पोहचवली आणि त्यानंतर त्यांच्या गोलंदाजी भेदक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्यामुळे आशिया कप विजेत्या संघाचा ऑलआऊट 19 षटकांत झाला आणि त्यांना केवळ 108 धावा करता आल्या. (T20 World Cup NAM vs SL)

विशेष म्हणजे गेल्या वर्षी 2021 मध्ये देखील श्रीलंका आणि नामिबिया यांनी टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळला होता. पण त्यावेळी श्रीलंकेने सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला होता. त्यावेळी लंकेने नामिबियाला 96 धावांत रोखले होते आणि त्यानंतर 13.3 षटकांत लक्ष्य गाठून विजयाची नोंद केली होती. यावेळी मात्र नामिबियाच्या संघाने श्रीलंकेला पूर्णपणे चकित केले आणि सामना जिंकला. (T20 World Cup NAM vs SL)

जेन फ्रायलिंकची अष्टपैलू कामगिरी, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तितकीच चमकदार गोलंदाजी यामुळे नामिबियाने माजी विश्वविजेत्या संघाचा 55 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून ऐतिहासिक विजय नोंदवला. यामुळेच नामिबियाच्या खेळाडूंना विजयानंतर आपले अश्रू आवरता आले नाहीत. मैदानावर ते भावूक झाले आणि रडू लागले. याशिवाय माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही या कामगिरीबद्दल नामिबियाचे अभिनंदन केले आहे. सचिनने लिहिले की, 'नामिबियाने क्रिकेट जगताला आपले नाव लक्षात ठेवण्यास सांगितले आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news