T20 World Cup Champions : ‘हे’ दोन संघ अद्याप विश्वचषकापासून वंचित; यांनी कोरले टी-२० वर्ल्डकपवर नाव

T20 World Cup Champions : ‘हे’ दोन संघ अद्याप विश्वचषकापासून वंचित; यांनी कोरले टी-२० वर्ल्डकपवर नाव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी २० क्रिकेटला २००५ पासून सुरूवात झाली. आयसीसीकडून पहिला टी २० विश्वचषक २००७ साली खेळवण्यात आला. पहिल्याच वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अविस्मरणीय कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावर केला. दरम्यान आजवर आठ टी २० विश्वचषक खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडचा संघ दोन वेळेस विश्वविजेता ठरला आहे. तर वेस्टइंडिजच्या संघानेही दोन वेळेस विश्वचषकावर नाव कोरले आहे. (T20 World Cup Champions)

कोण आहेत आजवरचे विजेते? (T20 World Cup Champions)

२००७ : पहिल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत विश्वचषकावर नाव कोरले होते.

२००९ : पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषक जिंकला होता.

२०१० : केविन पिटरसनच्या नेतृत्वातील इंग्लडच्या संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला धुळ चारत विश्वचषकावर पहिल्यांदा नाव कोरले.

२०१२ : वेस्टइंडिज संघाने श्रीलंकेवर मात करत पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला.

२०१४ : श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि विश्वचषकावर नाव कोरले होते.

२०१६ : २०१६ च्या टी-२० विश्वचषकात देखील इंग्लंडने अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यात शेवटच्या षटकात वेस्टइंडिजला २४ धावांची गरज होती. वेस्टइंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लॉस ब्रेथवेट याने स्टोक्सच्या पहिल्या ४ चेंडूवर ४ षटकार लगावले आणि विश्वचषक दुसऱ्यांदा आपल्या नावावर केला.

२०२१ : या विश्वचषकाचा अंतिम सामना कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८ गडी राखून विजय मिळवला आणि विश्वचषकावर नाव कोरले.

२०२२ : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि 5 विकेट्स राखून विजेतेपद पटकावले. (T20 World Cup Champion)

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विश्वचषकापासून वंचित

आजवरचा टी२० विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहता दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन संघांना कधीही विश्वचषक आपल्या नावावर करता आलेला नाही. २०२१ च्या टी २० विश्वचषकात न्यूझीलंडच्या संघाने अंतिम फेरी गाठली होती. न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा हा अंतिम सामना रंगला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत १७२ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांमध्ये या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आजवर एकदाही अंतिम फेरी गाठू शकला नाही. (T20 World Cup Champions)

एकदिवसीय विश्वचषकापासूनही न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका वंचित

टी २० बरोबरच एकदिवसीय विश्वचषकापासूनही न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ वंचित राहिला आहे. २०१८ साली न्यूझीलंडने अंतिम फेरीत इंग्लंडला कडवी झुंज दिली होती. प्रथम फलंदाजी करताना न्यूझींलडने २४१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडनेही २४१ धावाच केल्याने सामना बरोबरीत सुटला होता. यानंतर खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचीही पाटी कोरी राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेने चार वेळेस एकदिवसीय विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मात्र, विश्वचषक जिंकण्यात आफ्रिकेला अपयश आले. आयसीसीच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका खूप वेळा सेमी फायनलमधून बाहेर पडला आहे. त्यांनी अनेक वेळा जिंकणारा सामना गमावला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर चोकर्स हा शिक्का बसला आहे अद्याप हा शिक्का मिटविण्याची कामगिरी त्यांना बजावता आली नाही.  (T20 World Cup Champions)

बांग्लादेश आणि अफगानिस्तानही स्पर्धेत

आयसीसीच्या टी २० रँकींग मध्ये पहिल्या ८ मध्ये बांग्लादेश आणि अफगानिस्तान या संघांचा सातत्याने समावेश राहिला आहे. यंदाच्या विश्वचषकासाठी पहिल्या पात्र ६ संघांमध्ये बांग्लादेश आणि अफगानिस्तानचा समावेश होता. तर श्रीलंका आणि वेस्टइंडिज या विश्वविजेत्या संघांना पात्रताफेरी खेळायला लागली होती. तर वेस्टइंडिजचा संघ २ वेळा विश्वविजेता ठरलेला असतानाही त्यांना पहिल्या १२ संघांमध्ये स्थान मिळवता आले नाही. (T20 World Cup Champions)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news