IPL 2023 : KKR ला झटका, ‘या’ स्फोटक फलंदाजाने IPL मध्ये न खेळण्याची केली घोषणा

IPL 2023 : KKR ला झटका, ‘या’ स्फोटक फलंदाजाने IPL मध्ये न खेळण्याची केली घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सने (Sam Billings) इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. बिलिंग्स कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा भाग होता. बिलिंग्सने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. बिलिंग्सला KKR ने IPL 2022 च्या मेगा लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. गेल्या मोसमात त्याने 8 सामन्यांमध्ये 24.14 च्या सरासरीने 169 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 36 धावा होती.

बिलिंग्सने ट्विट केले की, 'पुढील आयपीएलमध्ये केकेआरकडून न खेळण्याचा मी कठीण निर्णय घेतला आहे. मला केंट क्रिकेट सोबत इंग्लिश उन्हाळ्याची सुरुवात करून क्रिकेटच्या दीर्घ फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करायचे आहे.' बिलिंग्सने आणखी एका ट्विटमध्ये केकेआरला खेळण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. बिलिंग्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 30 सामने खेळले आहेत आणि 56 च्या सर्वोत्तम स्कोअरसह 19.35 च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. कोलकाता व्यतिरिक्त, तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स संघाचा देखील भाग होता.

IPL 2023 च्या लिलावापूर्वी KKR ने विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सकडून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि अफगाणिस्तानचा विकेटकीपर फलंदाज रहमानउल्ला गुरबाज यांना खरेदी केले आहे. फर्ग्युसनला गुजरातने मेगा लिलावात 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. जेसन रॉयने माघार घेतल्यानंतर गुरबाजचा संघात समावेश केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news