T-20 WORLD CUP 2022 : पाकिस्तानने घेतली ‘टीम इंडिया’ची धास्ती; ही आहेत ३ कारणे

(T-20 WORLD CUP 2022 )
(T-20 WORLD CUP 2022 )

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ च्या टी-२० विश्वचषकाला शनिवारी (दि.२२) सुरूवात झाली आहे. तर रविवारी २३ ऑक्टोंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. पाकिस्तानने २०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. या पराभवचा वचपा काढण्याची संधी रोहित शर्मा आणि टीमकडे असणार आहे. (T-20 WORLD CUP 2022 )

उद्याचा सामना पाकिस्तानसाठी सोपा असणार नाही. या सामन्यासाठी भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याची विश्वचषकातील सर्वच संघांनी धास्ती घेतली आहे. एबी डिव्हिलीयर्स नंतर मैदानात चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज अशी सूर्यकुमार यादवची ओळख आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने जगातील दिग्गज गोलंदाजांसमोर दमदार फटकेबाजी केली आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवचा वापर ब्रह्मास्त्र म्हणून करणार असल्याच्या चर्चा आहेत. (T-20 WORLD CUP 2022 )

१.सूर्यकुमार यादवची फटकेबाजी (T-20 WORLD CUP 2022 )

चालू वर्षात सूर्यकुमार यादवची कामगिरी दमदार राहिली आहे. १ जानेवारी पासून आजपर्यंत खेळवण्यात आलेल्या २३ टी-२० सामन्यांमध्ये सूर्यकुमारने १८४.५६ च्या स्ट्राईक रेटने ८०१ धावा कुटल्या आहेत. या वर्षांत पाकिस्तानच्या रिझवाननंतर सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत.

२.षटकारांचा बादशहा

सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट चांगला आहे. यामागे त्याच्या षटकारांचे मोठे योगदान आहे. यावर्षी सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त षटकावर लगावले आहेत. यावर्षी टी-२० सर्वाधिक धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवानने १९ षटकार लगावले आहेत. तर सूर्यकुमारने ५१ षटकार लगावलेत. (T-20 WORLD CUP 2022 )

३.मैदानात चौफेर फटकेबाजी 

सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादव एकमेव असा फलंदाज आहे, जो मैदानाच्या प्रत्येक बाजुला फटकेबाजी करू शकतो. सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिवीलिर्यसशी केली जाते. एबी प्रमाणे सूर्यकुमारही ३६० डिग्रीत फटकेबाजी करू शकतो, असेही अनेक तज्ज्ञ म्हणत असतात.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news