Swara Bhaskar Troll : आधी म्हटलं होतं भाई, आता त्याच्याशीच केलं लग्न

swara-fahad ahmad
swara-fahad ahmad
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेधडकपणे आपले मत मांडणारी अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar Troll ) हिने समाजवादी पार्टीचा नेता फहद अहमदशी लग्न केल्यानंतर तिला आता ट्रोल केलं जात आहे. स्वराने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तिचे जुने फोटो आणि ट्विट व्हायरल केले जात आहेत. यामध्ये तिने फहद अहमदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जुने ट्विट सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. (Swara Bhaskar Troll )

ट्विटरवर व्हायरल झालेल्या जुन्या ट्विटमध्ये स्वराने फहद अहमदसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. या ट्विटमध्ये स्वराने फहदला 'भाई' म्हटल्याने आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय.

तिने ट्विटमध्ये म्हटलंय – जन्मदिन मुबारक फ़हाद मियाँ! भाई का कॉन्फ़िडेंस बरकरार रहे 🙂 @FahadZirarAhmad खुश रहो, आबाद रहो.. उम्र हो रही है अब शादी कर लो! ?????? Have a great birthday & a fantastic year dost! ✨
यावर उत्तर देत फहदने लिहिलं होतं- शुक्रिया ज़र्रानवाज़ी का दोस्त ? भाई के कॉन्फिडेंस ने तो झंडे गाड़े है वो तो बरकरार रहना ज़रूरी है….और हाँ, तुमने वादा किया था तुम मेरी शादी में आओगे तो वक़्त निकालो….लड़की मैंने ढूँढ ली है ???

फहद हा समाजवादी पार्टीचा नेता आहे. स्वराने फहदसोबत जानेवारीमध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. आता दोघे रीतीरिवाजानुसार लग्न करणार आहेत, अशी माहिती समोर आलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news