हॅते : Turkey Earthquake : गेल्या सोमवारी झालेल्या भयंकर भूकंपात भूईसपाट झालेल्या इमारतींचे ढिगारे उपसताना माणसे जिवंत सापडण्याच्याही घटना घडत असून काहरामनमारस येथे एका ढिगार्याखालून 248 तासांनंतर एका 17 वर्षीय तरुणीला बाहेर काढण्यात यश आले आहे. बाहेर काढले तेव्हा ती भूकेमुळे बेशुद्ध होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे आई-वडील मात्र भूकंपात मरण पावले.
Turkey Earthquake : आदीयामान शहरात बुधवारी ढिगारे उपसताना एका 77 वर्षीय महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आले. 228 तास ढिगार्याखाली राहूनही ही महिला शुद्धीत होती. बाहेर काढल्यावर तिने वाचवणार्यांना आज तारीख किती आहे असा प्रश्न विचारला. याच ढिगार्यातून तिच्या दोन मुलांनाही वाचवण्यात पथकाला यश आले.