Kanguva : सुरिया-दिशा पटानीच्या ‘कांगुवा’मध्ये रॉकस्टार डीएसपीचे संगीत (Video)

Kanguva movie
Kanguva movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते शिवाच्या आगामी तमिळ चित्रपट कांगुवाची अपेक्षीत झलक शेवटी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सुपरस्टार सुरियाच्या 48 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोठ्या उत्साहात याची पहिली झलक प्रेक्षकांना देण्यात आली. या पहिल्या झलकमध्ये सुरियाचा समावेश आहे. (Kanguva ) सोबतीला रॉकस्टार डीएसपीचे संगीत आहे. सोशल मीडियावर कांगुवाची झलक दिसल्यानंतर DSP च्या अनोख्या संगीताची स्तुती देखील पाहायला मिळाली आणि याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. (Kanguva )

अरुणराजा कामराजच्या खास गाण्याच्या ओळी संगीतातून अनुभवयाला मिळतात. कांगुवा 2024 च्या सुरुवातीला 10 भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर येणार असल्याची माहिती आहे. टीझर लाँच झाल्यापासून काही वेळातच इंटरनेटवर तुफान चर्चा सुरू झाली.

रॉकस्टार डीएसपी सध्या यूएसए मधील त्याच्या ओ अंतावा टूर मध्ये मग्न आहे. नुकताच सॅन जोसमधील यशस्वी शो करून हा दौरा २९ जुलै रोजी शिकागो येथे भव्य फिनालेसह संपन्न होणार आहे. कांगुवा व्यतिरिक्त तो अनेक उत्तमोत्तम चित्रपट करणार असल्याचं समजतं, ज्यामध्ये बहुप्रतीक्षित पुष्पा 2 देखील येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news