‘राम सेतू‘ला राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करा : याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा;- 'राम सेतू' ला राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याच्या विनंतीच्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाले आहे. राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याबाबतचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, अशी विनंती भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर स्वामी यांनी आपली बाजू मांडताना जनहित याचिकेवर सुनावणी घेण्याची वेळ आली आहे, असे नमूद केले. यावर तुमच्या याचिकेची लवकरच सुनावणी घेतली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती मागील महिन्‍यात झालेल्‍या सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news