Anand Mohan यांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी

सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बिहारचे माजी खासदार आनंद मोहन ( Anand Mohan ) यांच्या सुटकेला आव्हान देत तत्कालीन जिल्हाधिकारी जी. कृष्णैया यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या ८ मे रोजी सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज (दि.१) स्पष्ट केले.

कृष्णैया यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेले आनंद मोहन ( Anand Mohan ) यांची अलिकडेच बिहार सरकारच्या निर्णयानंतर सुटका करण्यात आली होती. मोहन यांच्या निर्देशावरुन कृष्णैया यांची हत्या झाल्याचा गुन्हा न्यायालयात सिध्द झाला होता. त्यानंतर मोहन हे शिक्षाही भोगत होते. तथापि बिहार सरकारने कायद्यात बदल करत मोहन यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. बिहारमधील नितीश कुमार सरकारवर यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ( bihar politics )

१९९४ साली कृष्णैया यांची जमावाकडून निर्घृण हत्या झाली होती. आनंद मोहन यांना पुन्हा अटक केली जावी, तसेच बिहार सरकारने मोहन यांच्या सुटकेसाठी कायद्यात जो बदल केला आहे, त्याला स्थगिती द्यावी, असे उमा कृष्णैया यांनी याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news