हिजाब प्रकरणाच्या वादावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत

सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील हिजाब प्रकरणाच्या वादावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. दोन दिवसांनी या प्रकरणी न्यायालय सुनावणी हाेईल. हिजाब प्रकरणी दाखल याचिकांना सुनावणीसाठी यादीबद्ध करण्यात येणार आहे.

सुत्रांच्या दिलेल्‍या माहितीनुसार, वरिष्ठ अधिवक्ता मीनाक्षी अरोडा यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी कायम ठेवण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांचा सरन्यायाधीश एन.व्ही.रमन्ना यांच्यासमक्ष उल्लेख केला. यावर सरन्यायाधीशांनी हे प्रकरण लिस्ट करून दोन दिवसांनी सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याच्या मुद्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल सुनावला होता. न्यायालयाने संस्थांमध्ये विद्यार्थीनींना हिजाब घालण्याची परवानगी देणारी मागणी फेटाळत हिजाब परिधाण करणे इस्लाम धर्माचा बंधनकारक भाग नाही, असे निकालात स्पष्ट सांगितले होते.

न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली होती. विद्यार्थीनी तसेच शिक्षकांना हिजाब घालण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच हिजाब घालणाऱ्या विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रावरील प्रवेश नाकारण्यात आले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर काय सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news