हिंदू विवाह कायदानुसार आंतरधर्मीयांनी केलेला विवाह अमान्‍य : सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निरीक्षण

सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिंदू विवाह कायद्यांतर्गतील कलमानुसार आतंरधर्मीय व्‍यक्‍तीने केलेला विवाह मान्‍य नाही.  हिंदू धर्मातील व्‍यक्‍तीच हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह करु शकतात, असे निरीक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्‍यात होणार आहे. ( Hindu Marriage Act ) हिंदू विवाह कायदानुसार विवाह केलेल्‍या ख्रिश्चन धर्मीय व्‍यक्‍तीविरोधात हैदराबाद पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणी  तेलंगणा उच्‍च न्‍यायालयाने ऑगस्‍ट २०१७ मध्‍ये दिलेल्‍या निर्णयाविरोधात संबंधित व्‍यक्‍तीने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी ( दि. १३) या याचिकेवर न्‍यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि बी. व्‍ही. नागरथना यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Hindu Marriage Act : काय घडलं होतं?

ख्रिश्चन धर्मीय व्‍यक्‍तीने फेब्रुवारी २००८ मध्‍ये हिंदू परंपरेप्रमाणे विवाह केला, असा दावा हिंदू तरुणीने केला होता. आमचा विवाह १९५५ हिंदू विवाह कायद्यानुसार झाले होते. मात्र विवाहानंतर संबंधित तरुणाने लग्‍न झालेच नसल्‍याचा पवित्रा घेतला असल्‍याची तक्रार तरुणीने पोलिसात दिली होती. या तक्रारीनुसार, हैदराबाद पोलिसांनी तरुणावर भारतीय दंड विधान कलम ४९४ नुसार ( पती किंवा पत्नीच्या हयातीत पुनर्विवाह करणे दंडनीय गुन्हा ) गुन्‍हा दाखल केला होता.

कारवाई रद्द करण्‍यासाठी तरुणाची सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव

आपला विवाह झालेला नाही. त्यामु‍‍ळे आपल्‍याविरोधात आयपीसी ४९४ नुसार करण्‍यात आलेली कारवाई मागे घ्‍यावी, अशी मागणी करणारी याचिका संबंधित तरुणाने सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्‍यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि बी. व्‍ही. नागरथना यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हिंदू विवाह कायद्यांतर्गतील कलमानुसार आतंरधर्मीय विवाह अमान्‍य आहे. केवळ हिंदू धर्मातील व्‍यक्‍तीच हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह करु शकतात, असे निरीक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयाने नोंदवले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्‍यात होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news