कोरोनावर ऍलोपॅथीमध्ये कुठलाही उपचार नाही, असा दावा बाबा रामदेव यांच्या पतंजलीने केल्यानंतरही केंद्रसरकारने कंपनीवर कारवाई का केली नाही? असा सवाल न्यायमूर्तींनी केला. त्यावर महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या मुद्याची दखल घेऊन पतंजली कपंनीने मोठी चूक केल्याचे सांगितले. बाबा रामदेव यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असून त्यांना शेवटची संधी दिली जावी, अशी विंनती बाबा रामदेव यांचे वकील बलबीरसिंग यांनी न्यायालयाला केली.